Maharashtra Politics News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: अजित पवारांसह राष्ट्रवादी आणि राजकीय नाट्याचा आजच फैसला?; एका घडामोडीनं सत्तापालटाच्या चर्चांना उधाण

Ajit Pawar May Join BJP: अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राज्यात लक्षवेधी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.

Gangappa Pujari

सुशांत सावंत, प्रतिनिधी...

Rahul Narvekar News: राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. स्वतः शरद पवार, अजित पवार राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले तरी, राज्यात लक्षवेधी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सध्याची मोठी घडामोड म्हणजे जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ जपानला गेले होते. ज्यामध्ये राहुल नार्वेकरही (Rahul Navrekar) होते. हा अभ्यास दौरा 11 ते 21 एप्रिलपर्यंत नियोजित होता. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज तातडीने परत मुंबईमध्ये येत आहेत. राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दौरा अर्धवट सोडून राहुल नार्वेकर मुंबईकडे येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया...

अजित पवार(Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी "ही केवळ तुमच्या मनातली चर्चा आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही," असे स्पष्टिकरण दिले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी....

तर दुसरीकडे "अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली असल्याचे मोठे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल," असेही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT