Sanjay Raut On BJP: 'भाजपच्या लोकांनाच वॉशिंग मशीनमध्ये टाकावं लागेल', संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय?

Latest News: सध्या राज्यामध्ये भाजपकडून सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv
Published On

Mumbai News: भाजप (BJP) राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) 40 आमदार फुटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. सध्या राज्यामध्ये भाजपकडून सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. 'तुम्ही कितीही फोडा फोडी करा. आमदार फोडा, खासदार फोडा. पण महाराष्ट्रातली जनता महाविकासआघाडीच्या पाठिशी आहे.' असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Sanjay Raut
Dhananjay Munde News : नाॅट रिचेबल धनंजय मुंडे मुंबईत; आधी मंत्रालयात, नंतर थेट पोहोचले विधानभवनात

संजय राऊत यांनी अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'कितीही वावड्या उडवू द्या. त्यांची ही भरती बिनपगारी असते. अलिकडेच कॉन्ट्रॅक्ट लेबर यांची भरती जास्त होतेय. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर घ्यायचा आहे त्यांनी घ्यावे. त्यांची वॉशिंग मशीन पुन्हा रिपेअर करायची वेळ आली आहे. कारण इतक्या वेळा धुवून झाले आहे. आता भाजपच्या लोकांनाच या वॉशिंग मशीनमध्ये टाकायची वेळ आली आहे.', अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut
Ajit Pawar: 'नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, त्यात तथ्य नाही'; अजित पवारांची साम टीव्हीला Exclusive माहिती

'भाजप अजित पवारांबाबत या वावड्या उठवत आहेत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. परंतु त्याचा काहीही फायदा होणार नाही.', असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मजबूत गटबंधन आहे. त्यामुळे ते किमान 145 विधानसभेच्या जागा जिंकणार. तुम्ही कितीही आमदार, खासदार फोडा परंतु महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी आहे.', असे देखील ते म्हणाले.

Sanjay Raut
Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांसह NCPबद्दल तुफान चर्चा, पण शरद पवारांनी 2 मिनिटांत विषयच संपवला

तसंच, 'मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरतील याची मला खात्री आहे. हा देश संविधान कायद्यानुसार चालतो. केंद्रातील काही लोकं यंत्रणांवर दबाव आणून त्यांना हवे तसे निकाल घेत असतील. पण अजूनही या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये राम शास्त्री आहेत म्हणून आम्हाला खात्री आहे. निकाल आणि न्याय याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला न्याय मिळेल हे नक्की.' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com