Dhananjay Munde News : नाॅट रिचेबल धनंजय मुंडे मुंबईत; आधी मंत्रालयात, नंतर थेट पोहोचले विधानभवनात
Dhananjay Munde News Update : अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे काल पासून नॉट रिचेबल होते. मात्र आता धनंजय मुंडे हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालय नंतर धनंजय मुंडे हे विधानभवनात दाखल झाले आहे. (Latest Marathi News)
मुंडे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. मंत्रालयातील लोढा यांच्या कार्यालयातील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे फोटो समोर आले असून लोढा यांच्या भेटीनंतर ते आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दाखल झाले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Political News)
मविआचे ४० आमदार फुटणार
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळततेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.