Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam TV

Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांच्या नंतर राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार नाॅट रिचेबल

धनंजय मुंडे यांच्या नंतर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार नाॅट रिचेबल झाले आहेत.

Pandharpur News : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या नंतर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे देखील नाॅट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Dhananjay Munde
Ajit Pawar: 'नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, त्यात तथ्य नाही'; अजित पवारांची साम टीव्हीला Exclusive माहिती

आमदार बबन शिंदे यांची अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थक अशी सुरवाती पासून ओळख आहे. आमदार शिंदे हे मागील दिवसांपासून भाजपात जाणार अशी चर्चा ही सुरू आहे. अलिकडेच त्यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आमदार शिंदे यांची भेट घेतल्याची ही चर्चा होती. आज सकाळ पासून आमदार शिंदे यांचा मोबाईल बंद आहे. त्यांच्या खासगी पीएच ही नाॅट रिचेबल आहे. आमदार शिंदे हे माढ्यातून 4 वेळा निवडून आले आहेत.

धनंजय मुंडे नाॅट रिचेबल

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले दोन्हीही फोन बंद ठेवले आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चे नंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडे हे काल संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  (Latest Political News)

Dhananjay Munde
Nashik Crime News: अंधश्रद्धेचा बळी! डॉक्टरकडे नाही भोंदूबाबाकडे गेला, तरुण पुन्हा परतलाच नाही; नाशिकमधील धक्कादायक घटना

 मविआचे ४० आमदार फुटणार

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळततेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com