Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Operation Tiger: ठाकरे शिंदेंना धक्का देणार, ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी धडपड; आज चित्र होणार स्पष्ट

Operation Tiger Under Spotlight: एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंनी फोडले. पण आज उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Priya More
  • उद्धव ठाकरे शिंदेंना धक्का देणार

  • ऑपरेशन टायगर फेल करण्याच्या तयारीत

  • ठाकरे गटाची आज सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक होणार

  • ठाकरेंचे ६ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा

  • ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांची मनधरणी सुरू

गिरीश कांबळे, मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय पक्षाची आज सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला नेमके किती आणि कोणते खासदार उपस्थित राहतात यावरच पक्षाची पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी ठाकरेंकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. बंडखोरीची चर्चा सुरू झाल्यापासून संबंधित खासदारांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाला अद्याप शिंदे यांच्या शिवसेनेकडे ६ खासदार निश्चितपणे गेल्याचा विश्वास नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत उपस्थित राहणाऱ्या खासदारांच्या संख्येनंतरच कथित ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले की नाही, याचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ६ खासदारांपैकी दोन खासदारांनी आपली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने कोणत्याही पत्रावर सही केलेली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे दोघेही आजच्या बैठकीला उपस्थित राहतील, असा विश्वास ठाकरे गटाला आहे.

दरम्यान, कोणत्याही खासदाराबाबत सार्वजनिक प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना ठाकरे शिवसेनेकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती आहे. सध्या ठाकरे गटाकडे सर्व खासदार सोबत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. दुसरीकडे, शिंदे शिवसेनेकडूनही ६ खासदारांच्या सह्यांचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आल्याची अधिकृत घोषणा किंवा त्यासंदर्भातील कोणताही फोटो अद्याप समोर आलेला नाही. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले की नाही? याबाबत दोन्ही गटांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसून सस्पेन्स कायम आहे.

बंडखोरीची चर्चा सुरू झाल्यापासून संबंधित खासदारांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला होता. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचा संबंधित खासदारांशी संपर्क झाला होता. मात्र, बुधवारी कोणत्याही नेत्याचा खासदारांशी संपर्क झाल्याची माहिती नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्याशी आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर हे सातत्याने संपर्क साधत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित नेते संपर्कातून मिळणारी संपूर्ण माहिती थेट उद्धव ठाकरे यांना देत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आता उद्धव ठाकरे ऑपरेशन टायगर फेल कसे करतात हे पाहणं महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT