Maharashtra Police Recruitment  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात ८१०० पोलिसांची भरती, अनेकांचे पोलिस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

Maharashtra Police Recruitment 2027: राज्यातील अनेक तरुणाचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सरकार ८१०० पोलिसांची भरती करणार आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी...

Priya More
  • महाराष्ट्र पोलिस दलात नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण

  • या भरती प्रक्रियेअंतर्गत ८१०० रिक्त जागांसाठी होणार भरती

  • सोलापूर जिल्ह्यात ११७ पोलिस पदांची भरती

  • १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल

पोलिस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यंदा त्यांचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यात लवकरच ८१०० पोलिसांची भरती होणार आहे. गृह मंत्रालयाकडून यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांची माहिती गृह मंत्रालयाने मागवली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११७ पोलिसांची पदं भरली जाणार आहेत. नवीन वर्षात म्हणजे २०२७ मध्ये पोलिस भरतीला सुरूवात होईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकारकडून सध्या पोलिस भरती सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विक्रमी पोलिस भरती झाल्या आहेत. गेल्या २ वर्षांपासून दरवर्षी पोलिस भरती केली जात आहे. यावर्षी १५,६३१ पोलिसांची भरती झाली. अशातच आता पुढच्या वर्षात म्हणजे २०२७ मध्ये देखील मोठी पोलिस भरती होणार आहे. पोलिस व्हायची इच्छा असणाऱ्या तरुणांनी आताच तयारीला लागावे.

जून २०२७ पर्यंत राज्यातील रिक्त असणाऱ्या जवळपास ८१०० पोलिसांच्या रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. तर मागच्यावेळी भरती झालेल्यांचे जूनपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये पोलिसांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारी २०२७ पासूनच नवीन पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत ८१०० पोलिसांची रिक्त पदं भरली जाणार आहेत. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ हा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत भरतीला सुरूवात होणार आहे. तरुणांनी या भरतीसाठी आताच तयारी केली तर त्यांच्यासाठी फायदेशीर राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT