eknath shinde yandex
महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Maharashtra CM : मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वालाच मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २ दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल, असे सांगण्यात येतेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra New CM News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, पण आता मुख्यमंत्रीपदावरुन पेच झालाय. १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपला मुख्यमंत्रीपद हवेय. तर ५७ जागा असणाऱ्या शिंदेंची शिवसेनाही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे राज्याला नवा मुख्यमंत्री कोण मिळणार? याबाबत तक्र वितर्क लढवले जात आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदेंना २ ऑफरही दिल्या आहेत.

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वालाच मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील नेते दिल्लीत किंवा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवणार असल्याचे संकेत अजित पवार गटाकडून देण्यात आले.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. देवेंद्र फडणवीस यांना १७८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी पत्र देण्यात आलेय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पारडे जड मानले जातेय. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येतोय. शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली जातेय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

एकनाथ शिंदेंना ऑफर -

भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपद हवेय. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेत्यांनी तसे बोलून दाखवलेय.शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून दोन ऑफर दिल्याचे समजतेय. केंद्रातील नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंना केंद्रात मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ॲाफर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

केंद्रीय नेतृत्वाने ॲाफर देऊनही अद्याप राज्य पातळींवर निर्णय न झाल्याने मध्यस्ती करण्याची गरज असल्याची चर्चा झाली.

महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातील सत्ता स्थिर रहावी, असे प्रयत्न केंद्रीय नेतृत्व करत आहे. भाजपकडे बहुमताच्या अगदी जवळ जाणारे आकडे असतानाही दोन मित्र पक्षांना सोबत घ्यावे लागणार आहे. या स्थितीत तिनही पक्षातील समन्वय टिकून ठेवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.

मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला, अन्य पदे, यात एकवाक्यता रहावी. २०१९ सारखी सर्वात मोठा पक्ष असतानाही नामुष्कीची वेळ येऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचा केंद्रातील नेतृत्वाकडून घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT