Adani Group Taken Over Chandrapur School: Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Adani Group Taken Over Chandrapur School: चंद्रपुरमधील माउंट कार्मेल कॅान्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहे. या निर्णयानंतर आता , पुढील १५ दिवसात शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई| ता. २९ सप्टेंबर

Chandrapur News: महाराष्ट्रात ६ हजार ६०० मेगावॉट वीजपुरवठ्यासाठीचे कंत्राट अदानी समुहाला दिल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा अदानी समूहाला हस्तांतरीत करण्यात आली असून चंद्रपुरमधील माउंट कार्मेल कॅान्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहे. या निर्णयानंतर आता , पुढील १५ दिवसात शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

घुग्घुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासह अदानी समूहाने आता चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने यासंदर्भात २७ सप्टेंबर रोजी शासन आदेश जारी केला आहे. माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुघुस, कार्मेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, एक इंग्रजी माध्यमाची स्वयं-वित्तपोषित शाळा आहे.

ही शाळा अदानी फाऊंडेशन, अहमदाबाद येथे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. या संदर्भात 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अवघ्या तीन महिन्यांत या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आणि शाळा अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करताना सरकारने काही अटीही घातल्या आहेत ज्यांचे पालन अदानी फाऊंडेशनला करावे लागणार आहे.

मुख्य अट म्हणजे अदानी समूह शाळेतील विद्यार्थी संख्येत कोणताही बदल करू शकत नाही. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारीही अदानी समूहाची असेल. अदानी यांना येत्या १५ दिवसांत या शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घ्यायचे आहे. व्यवस्थापनाबाबत किंवा भविष्यात नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार आल्यास शाळेचे हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT