Maharashtra Politics : दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ

Anand dighe death news : दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा एकदा राजकारण रंगला आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.
दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ
Maharashtra Politics Saam tv
Published On

मुंबई : ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू की मारलं गेलं याबाबत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय. त्यावरुन शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलाय. ऐन विधानसभेच्या तोंडावर दिघेंच्या मृत्यूवरुन काय राजकारण रंगलं आहे.

ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला की मारलं गेलं याबाबत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय. 'आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे, आनंद दिघे हे ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आहेत, तर सरकार तुमचंच चौकशी करा, असं म्हणत ठाकरे गटाने संजय शिरसाटांना थेट आव्हान दिलंय.

दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ
Kalyan Political News: कल्याणमध्ये शिंदे गटातील इच्छुकांची यादी वाढली, भाजप आमदारांच्या कमानी शेजारीच शिंदे गटाच्या इच्छुकाचा बॅनर

ऐन विधानसभेच्या तोंडावर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आलायं. धर्मवीर – 2 या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झालाय. या सीनमध्ये ठाण्याच्या हॉस्पीटलमधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदेंचं पात्र धावताना दाखवलंय. हा सीन खरंच घडला होता का यावरुन वाद निर्माण झालाय. त्यातच शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. यावर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनीही उत्तर दिलंय.

या आरोप-प्रत्योरापानंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली. 'आनंद दिघेंसाहेबांच्या नावानं राजकारण सुरु आहे, असं आरोप केदार दिघे यांनी केला आहे.

दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ
Political News : ''आमचं बरंचसं ठरलंय''; 'त्या' मागणीवर अजितदादांचे स्पष्टीकरण

ऐन विधानसभेच्या तोंडावर संजय शिरसाटांनी केलेल्या आरोपांनी पुन्हा दिघेंच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आता हा चित्रपटासाठी केलेला पब्लिसीटी स्टंट म्हणायचा की खरचं आनंद दिघेंच्या मृत्यूची चौकशी शिंदे सरकार करणार याचीच साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com