अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यात आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.
बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तुषार दोषी आणि आंचल दलाल यांच्या नावाचाही समावेश आहे. एका आठवड्याआधी ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या बड्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागल्याचे दिसत आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. आंचल दलाल यांची रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदावर तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन बगाते यांचे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. आहे. रितू खोकर यांची धाराशिवचे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
अर्चित चांडक यांच्याकडे अकोल्याचे पोलिस अधीक्षकपद सोपवण्यात आलं आहे. तर योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. जयंत मीना यांची लातूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.