maharashtra navnirman vidyarthi sena morcha at yeola tashil office saam tv
महाराष्ट्र

MPSC च्या माध्यमातून शासकीय भरती प्रक्रिया राबवावी, 'मनविसे'चा येवला तहसील कार्यालयावर माेर्चा

maharashtra navnirman vidyarthi sena latest news : आमची मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात माेठे आंदाेलन छेडणार असल्याचे मनविसे पदाधिका-यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया खाजगी संस्थे मार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घ्यावी या व अन्य मागण्यांसाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नाशिक जिल्ह्यातील येवला तहसिल कार्यालयावर माेर्चा (maharashtra navnirman vidyarthi sena morcha at yeola tashil office) काढला. यावेळी आंदाेलकांनी तहसिल कार्यालय परिसरात घाेषणाबाजी करुन परिसर दणाणून साेडला. (Maharashtra News)

मनसे पदाधिकारी म्हणताे सध्या शासनातर्फे ज्या भरती केल्या जातीहेत त्या खाजगी संस्था मार्फत होत आहेत. काळ्या यादीत या संस्थांचे नाव असताना त्यांचीच भरतीसाठी नियुक्ती केली गेली. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना १००० ते १२०० रुपये खर्च येतो. त्यामुळे शासनाने त्याची दखल घ्यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी संघटनेने केली आहे.

मनसे विद्यार्थी संघटनेने नायब तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फतच घ्यावी असे म्हटले आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात माेठे आंदाेलन छेडणार असल्याचे मनविसे पदाधिका-यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

SCROLL FOR NEXT