cancel eggs from mid day meal scheme demands warkari sampraday in navi mumbai
cancel eggs from mid day meal scheme demands warkari sampraday in navi mumbaisaam tv

Navi Mumbai : मध्यान्ह भोजनात अंडी देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा : वारकरी अधिवेशनात ठराव

Warkari Sampraday News : तीर्थ क्षेत्रा जवळील नद्या प्रदूषणमुक्त कराव्यात, तीर्थक्षेत्राजवळ मांस विक्रीला बंदी आणावी असे ठराव करण्यात आले.
Published on

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात करण्यात आला आहे. सरकारने आमच्या मागण्याची गांभीर्याने विचार करावा अन्यथा वारकरी संप्रदाय आंदाेलन छेडेल असा इशारा वारकरी संप्रदायाचे सचिव नरहरी चौधरी यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला. (Maharashtra News)

संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित खारघरमध्ये (kharghar) राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह आणि वारकरी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

cancel eggs from mid day meal scheme demands warkari sampraday in navi mumbai
Palghar : जिजाऊ संघटना लोकसभेच्या सात जागा लढवणार : निलेश सांबरे

यामध्ये वारकरी संप्रदाया तर्फे महत्वाचे ठराव मांडण्यात आलेत. यामध्ये तीर्थ क्षेत्रा जवळील नद्या प्रदूषणमुक्त कराव्यात, तीर्थक्षेत्राजवळ मांस विक्रीला बंदी आणावी असे ठराव करण्यात आले. याबराेबरच राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. राज्य शासनाने मागण्यांचा विचार करावा अन्यथा सरकारला जागा दाखवू असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

cancel eggs from mid day meal scheme demands warkari sampraday in navi mumbai
Parniti Shinde : काँग्रेस नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, भाजपवर प्रणिती शिंदेंचा राेख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com