Shiv Sena (Shinde faction) candidates celebrate a clean sweep victory in Ward 16 of Nashik Municipal Corporation elections. Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा वरचष्मा, अख्खं पॅनलच वनसाईड विजयी

Nashik Ward 16 Complete Panel Win By Shinde Group: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने दमदार एन्ट्री घेतली आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील चारही जागांवर शिंदे गटाच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्यात वरचष्मा सिद्ध केला आहे.

Omkar Sonawane

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात शिंदे गटाच्या शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. नाशिक महापालिकेचा पहिला अधिकृत निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक 16 मधून शिंदेंच्या शिवसेनेने घवघवीत यश मिळवले आहे. प्रभाग 16 मधील चारही जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले आणि ज्योती जोंधळे यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. या निकालामुळे नाशिकच्या राजकारणात शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात असून पुढील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेले सुधाकर बडगुजर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. स्वतःच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. प्रभाग क्रमांक २५ मधील चार जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे. भाजपचे सुधाकर बडगुजर आणि साधना मटाले हे दोघे विजयी झाले आहेत. मात्र उर्वरित दोन जागांवर भाजपला धक्का बसला असून, एक जागा शिंदे गटाच्या शिवसेनेने तर एक जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिंकली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेच्या कविता नाईक तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्वतःच्या घरच्या प्रभागात चारही जागांवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सुधाकर बडगुजर यांना हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. नाशिकमधील राजकीय समीकरणांमध्ये या निकालामुळे मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत भाजपची मोठी आगेकूच; गणेश नाईकांनी खोचक पोस्ट करत शिंदेंना डिवचलं|VIDEO

Vasai-Virar Result: वसई-विरारमध्ये भाजपला जोरदार झटका, वबिआची एकहाती सत्ता; साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला

Blouse Design: सिंपल लूक दिसेल मॉडर्न, हे आहेत लेटेस्ट ब्लाऊजचे 5 पॅटर्न

Maharashtra Elections Result Live Update :पिंपरी चिंचवडमध्ये कोणाची सत्ता? वाचा आतापर्यंतचा निकाल

Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT