Agriculture Department advice to maharashtra Farmers  Saam TV
महाराष्ट्र

Kharif Crop Season : शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी कधी करावी? कृषी विभागाने दिला मोलाचा सल्ला

Maharashtra Monsoon Updates : राज्यात सध्या सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच पेरणी नेमकी कधी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर कृषी विभागाने मोलाचा सल्ला दिला आहे.

विनोद जिरे

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला असून सध्या तळकोकणाला मौसमी वाऱ्यांनी व्यापलं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.

मात्र, कृषी खात्याने शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. मात्र जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीची घाई करू नये, असा सल्ला बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.

साधारणतः ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. जमिनीत ६ इंच खोल ओल गेल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहनही बाबासाहेब जेजूरकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. पेरणी करण्यापूर्वी घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे.

रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा रासायनिक खते वापरण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्याचबरोबर खतांचा बेसल डोस ठरविताना माती परीक्षण अहवाल अथवा गावचा जमीन सुपीकता निर्देशांक याचा वापर करून तो पेरणीवेळी द्यावा, असं देखील बाबासाहेब जेजुरकर म्हणाले.

त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची बचत होण्यासाठी बियाण्यांची जैविक खतांची बीज प्रक्रिया करावी. गावचे कृषी सहायक यांना संपर्क करून बियाणे उगवण बीज प्रक्रिया आदींचे प्रात्यक्षिक करू शकता, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT