maharashtra rain update Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रावरील ढग गायब, पाऊस गेला कुणीकडे? पुढील २ दिवस कसं असेल हवामान?

maharashtra rain update : महाराष्ट्रावरील ढग गायब झाल्याने पाऊस कधी कोसळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

राज्यात पावसाची स्थिती दयनीय

पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा कडाका कायम

येत्या दोन दिवसांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

देशातील विविध राज्यात मान्सून पूर्व पासाने हजेरी लावली आहे. काही राज्यात पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात पावसाची स्थिती दयनीय झाली आहे. एकीकडे ४ जून रोजी केरळमध्ये पाऊस दाखल झाला. १५ दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली नाही. राज्यात पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा कडाका कायम असल्याचे दिसत आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील काही दिवसांत राज्यात सामान्य सरासरीपेक्षा ७८ टक्के कमी पाऊस नोंदवला गेलाय. तर महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही कमी पाऊस नोंदवला गेलाय. ४ ते १८ जूनदरम्यान संपूर्ण देशात केवळ ४१ टक्के कमी पाऊस झालाय.

पाऊस लांबल्याने राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढला आहे. काही शहरात तापमान ४० सेल्सिअस अंशाच्या वर गेला आहे. विदर्भातील काही भागात ४२.३ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

एका रिपोर्टनुसार, इंटरट्रॉपिकल कन्जर्व्हेन्स झोन पुरेसा सक्रिया झालेला नाही, त्यामुळे मान्सूनचा वेग मंदावलाय. प्रशांत महासागरातही 'अल निनो'ची परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात दीर्घकाल कोरडा दुष्काळ किंवा असमान पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यात ढगांची घनता कमी आहे.

पुढील दोन दिवस कसं राहील वातावरण?

पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २० जून रोजी विदर्भाच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. तर २१ जून रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकला लागून असलेल्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

तत्पूर्वी, 'जेट स्ट्रीम' पॅर्टन कमकुवत झाल्यानंतर मान्सूनचे वारे पुन्हा गती घेण्याची शक्यता आहे. वारे कमकुवत झाल्यानंतर पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भाग, कर्नाटक, छत्तीसगडमध्ये पुढे सरकरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

SCROLL FOR NEXT