Padalkar vs Awhad saamtv
महाराष्ट्र

Padalkar vs Awhad: विधानसभेच्या गेटसमोरच गोपीचंद पडळकर-जितेंद्र आव्हाड भिडले; दोन्ही नेत्यांकडून शिवीगाळ|व्हिडिओ

Maharashtra Monsoon Assemly Session: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केलीय.

Bharat Jadhav

पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विधिमंडळाच्या सभागृहात खडाजंगी होत आहे. हीच खडाजंगी विधासभेच्या बाहेरसुद्धा पाहायला मिळत आहे. आज विधानसभेच्या गेटसमोर भाजप आमदार गोपीचंद पळकर आणि जितेंद्र आव्हाड हे एकमेंकांना भिडले. दोन्ही नेत्यांनी एकमेंकांना शिवीगाळ केलीय.

गोपीचंद पडळकर हे विधानसभेत कारने येत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कराच्या दरवाजाला आतून लाथ मारली. कारचा दरवाजा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लागला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडळकर आणि आव्हाड एकमेंकांना बघून घेण्याची भाषा करताना दिसत आहेत.

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. मी आणि माझे सहकारी जात होतो. त्यावेळी पडळकर यांनी कार अंगावर आणत. कारच्या दरवाजाला लाथ मारली. तो दरवाजा आम्हाला लागला. कारचा दरवाजा आम्हाला लागावा याच उद्देशाने त्यांनी त्याला लाथ मारली. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. मी तेथून पुढे निघालो. परंतु त्यांनी शिवीगाळ केली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचलं होतं. त्याचाच राग मनात धरत पडळकर यांनी आव्हाड यांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, मी मंगळसूत्र चोर म्हणून ओरडलं. त्याचा राग त्यांना का आला. ते खरंच मंगळसूत्र चोर आहेत का? जेव्हा तुम्ही माझ्या राजकीय करिअरवरून टीका टिप्पणी करता तेव्हा तुमच्यावर टीका टिप्पणी केली जाईल, त्याला तयार राहिलं पाहिजे, असं आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT