kognoli toll plaza
kognoli toll plaza saam tv
महाराष्ट्र

Karnataka Security At Kognoli Toll Plaza : महाराष्ट्रातील मंत्र्यांसह नेत्यांना बेळगावात नाे एंट्री, जिल्हाधिका-यांचा आदेश

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : महाराष्ट्रातील नेत्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता बेळगाव जिल्हा प्रशासनास वाटत आहे. यामुळे प्रशासनाने महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत. हा आदेश 2 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत लागू राहणार आहे.(Maharashtra News)

बेळगावात उद्या (ता. एक नोव्हेंबर) महाराष्ट्र एकीकरण समिती काळादिन पाळून रॅली काढणार आहे. त्यानंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या काळादिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai), चंद्रकांत दादा पाटील (chandrakant dada patil) , मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) आणि खासदार धैर्यशील माने (mp dhairyasheel mane) येणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषेत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण व कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगाव शहर व जिल्ह्यात बंदी घातली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या आदेशात नमूद केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Swati Maliwal Assult Case: स्वाती मालीवाल प्रकरण नेमकं काय, एफआयआरमध्ये नेमके कोणते आरोप केले?

Sangli News : कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक; सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले

Anil Deshmukh News : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT