Maratha Aarakshan Andolan : हार तुरे, सत्कार स्विकारताना मराठा आंदाेलकांनी आमदारांना रोखले, जाब विचारताच...

आमचे देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा असल्याचे आमदार म्हेत्रेंनी नमूद केले.
solapur
solapursaam tv
Published On

- विश्वभूषण लिमये / भारत नागणे

Maratha Reservation : सोलापूर शासकीय विश्रामगृहात आज (साेमवार) कोकण शिक्षक मतदार संघांचे आमदार ज्ञानेश्वर म्हेत्रे (dnyaneshwar mhatre) यांना मराठा समाज आंदोलकांनी घेराव घातला. त्यानंतर भाजपचे आमदार ज्ञानेश्वर म्हेत्रेंनी त्यांच्या बैठका रद्द करीत मराठा आंदाेलकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. (Maharashtra News)

solapur
Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज सातारकरांचे स्मारक राज्य सरकार उभारेल : देवेंद्र फडणवीस

मराठा बांधवांनी दिलेल्या माहितीनूसार आमदार ज्ञानेश्वर म्हेत्रे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांची बैठक लावली हाेती. त्यात ते हार तुरे, सत्काराचा कार्यक्रम घेत हाेते. त्याच वेळी मराठा बांधवांनी त्यांनी रोखले. मराठा बांधव आक्रमक झाल्याने आमदार म्हेत्रे यांनी संबंधित बैठक रद्द केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

solapur
Sugarcane : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'या' साखर कारखान्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर

माध्यमांशी बाेलताना त्यांनी हा नियाेजित दाैरा नव्हता देवदर्शनाला आलाे हाेताे. त्यावेळी काही शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी भेट घ्यायची असे सांगितले. त्यांची भेट घेण्यासाठी आलाे हाेताे. आमचे देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा असल्याचे म्हेत्रेंनी नमूद केले.

पंढरपूर जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदाेलन तीव्र

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चक्क गावातून निषेध फेरी काढून स्मशानभूमीत पाेस्टर्सचे दहन करण्यात आले.

यावेळी मराठा समाजाच्या तरूणांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. सरकारने दोन दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

श्रीपूरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये न जाता आंदोलन स्थळी येत मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या प्रश्नाला पाठिंबा दिला. लवकरात लवकर आरक्षण मिळावे. अन्यथा पुढील पिढ्यांचे खूप मोठे नुकसान होईल अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान राज्य सरकारने बैठकांचा फार्स न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा एका ही मंत्र्याला घरा बाहेर पडू देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी सरकारला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

solapur
Antarwali Sarati News : उदयनराजे भाेसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपाेषण स्थगित करणार? (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com