Manikrao Kokate online game controversy video Saam TV news Marathi
महाराष्ट्र

...तर राजीनामा द्यायला तयार, व्हायरल व्हिडिओवरून माणिकराव कोकाटे स्पष्टच बोलले

Agriculture Minister Manikrao Kokate : ऑनलाइन गेम प्रकरणावर कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलं. रमी खेळत असल्याचा आरोप फेटाळला. दोषी ठरलो तर राजीनामा देईन असं स्पष्ट करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला.

Namdeo Kumbhar

Maharashtra Minister Manikrao Kokate press conference Live : ऑनलाइन गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागण्यात आला होता. त्यावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले. मला रमी खेळताच येत नाही. तसे आढळले तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याशिवाय राजीनाम्याच्या मागणीवर कोकाटे म्हणले तितका मोठा विषय आहे का? राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानभवनात काय करायचं, ते मला चांगलेच कळते, असेही कोकाटे म्हणाले.

नाशिक येथे पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे बोलत होते. विधिमंडळात ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. माणिकराव कोकाटे यांच्या या व्हिडिओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय अजित पवार यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल. राजीनामा देण्यासारखं काही घडलेच नाही, असे कोकाटे म्हणाले.

राजीनामा देण्यासारखं काही घडलेच नाही. रमी खेळताना दोषी आढळलो तर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मी स्वत: राजीनामा देईल. बदनामी केली त्यांना कोर्टात खेचणार. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, त्यासाठी पत्र पाठवणार आहे. मला रमी खेळताच येत नाही. त्यासाठी माझं कोणतेही बँक खाते अथवा मोबाईल क्रमांक जोडलेला नाही, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर काय म्हणाले कोकाटे ?

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना कोकाटे म्हणाले की, बातम्या पाहून मुख्यमंत्री बोलले असतील. रमी खेळतानाचा व्हिडिओ खरा असेल तर मी स्वत: राजीनामा देईल. आता राजीनामा देण्याचा विषयच येत नाही, असे कोकाटे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, त्याशिवाय ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, त्या सर्वांना कोर्टात खेचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT