Maharashtra Weather Forecast  Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : उन्हाच्या तडाख्यातही महाराष्ट्र होणार 'अवकाळी चिंब'; पाऊस धो-धो कोसळणार, पण विदर्भ तापणार

Maharashtra Weather Forecast : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Prashant Patil

पुणे : होळीनंतर राज्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाचा पारा चढल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पार तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. होळीच्या अगोदरच हवामान खात्याकडून दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. काल बुधवारपेक्षा आज वातावरणात उष्णता आणि उकाडा अधिक जाणवणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच लातूरला अवकाळी पावसाने झोडपल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी वातावरण अंशतः ढगाळ आणि दुपार, संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ अंश सेल्सिअस आणि २३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आजही दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळीच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. अकोल्याच्या तापमानाची नोंद काल ४१.४ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. जळगाव, चंद्रपूर, अमरावतीमध्ये पारा ४० वर पोहोचला होता. परभणी, वाशिम, वर्धा मालेगाव, यवतमाळ धुळे याठिकाणी ३९ अंशावर तापमान गेल्याचं बघायला मिळालं. तर पुण्याच तापमानाचा पारा आज वाढण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये काल पारा ३८ अंशावर पोहोचल्याचं बघायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT