दिवाळीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
मतदार यादी, आरक्षण व निवडणूक तयारी सुरू आहे, राज्यात ९ कोटी ८० लाख मतदार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगराध्यक्ष आता सामान्य जनतेतून निवडले जातील.
Election News : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नियोजन करायला सुरुवात केली आहे. मार्च २०२२ पासून राज्यात महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज सुरु आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषद यांच्या निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. ऐन दिवाळीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या नगरपरिषद आणि नगरपालिका यांच्या मतदार यादीची कार्यक्रम जाहीर झाला. यानंतर आरक्षण ठरवले जाणार आहे. यादरम्यान जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा कार्यक्रम देखील जाहीर झाल्याचे म्हटले जात आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पहिल्या टप्प्यात घेतल्या जातील.
महानगरपालिकांच्या वॉर्ड रचनेचा विषय अजून ठरलेला नसल्याने या मनपा निवडणुका डिसेंबर-जानेवारी या महिन्यात होतील असे म्हटले जात आहे. दिवाळीमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका होतील. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएमसह इतर सोयीसुविधा लक्षात घेऊन निवडणुकींचा कार्यक्रम तयार केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यभरात तब्बल ९ कोटी ८० लाख मतदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे भविष्य ठरणार असल्याने सर्वांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.
नगर पंचायत, नगर परिषद आणि नगर पालिका यांच्या नगराध्यक्षांची निवड सामान्य जनतेमधूनच होणार आहे. सरकारच्या वतीने नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. २०१९ नंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नगराध्यक्षांची निवड ही बहुमताने झाली होती. यात पुन्हा बदल करण्यात आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगराध्यक्ष हे सर्वसामन्यांमधून निवडले जातील हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था
जिल्हा परिषदा - ३२
पंचायत समित्या - ३३१
महापालिका - २९
नगरपालिका-नगरपरिषदा - २८९
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.