
पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात अपडेट
घायवळच्या कुटुंबियांची पोलीस चौकशी करणार
पासपोर्टसाठी फेरफार केल्याचा तपास होणार
अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Pune : पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. कारवाई सुरु असताना निलेश घायवळ लंडनला पळून गेला. पळून जाताना घायवळने अहिल्यानगरमधील घराच्या बनावट पत्त्याचा वापर केला होता.
कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता या प्रकरणात निलेश घायवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या पासपोर्टबद्दलही चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलीस आता घायवळच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करणार आहेत.
निलेश घायवळची बायको आणि मुलगा यांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी काही फेरफार केला आहे का? या दृष्टीने पुणे पोलिसांनी पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून निलेश घायवळ याच्या कुटुंबियांच्या पासपोर्टबद्दल माहिती पोलिसांनी मिळवली आहे. या प्रकरणात घायवळ कुटुंबावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील एका घराचा खोटा पत्ता दिला होता. त्याच्याकडे दोन मतदान ओळखपत्र होते. आता त्याच्याबाबत आणखी माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये बँकेचे खाते उघडण्यासाठी दिलेल्या रहिवासी पुरावे दिल्यानंतर याच खात्याचा आधार घेत पासपोर्ट मिळवला अशी नवी माहिती समोर आली आहे. खोटा पासपोर्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.