Bhiwandi Crime : भक्षकच! चिमुरडीचे शोषण केल्यानंतर अटक, २ महिन्यांपूर्वी कोर्टातून पळाला अन् पुन्हा अत्याचार करुन लहान मुलीला संपवलं

Bhiwandi : सहा वर्षांच्या चिमुरडीचे शोषण केल्याप्रकरणी एका आरोपीला अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. तो न्यायालयातून पसार झाला. आरोपीने फरार असताना पुन्हा एका चिमुरडीचे शोषण केले.
Bhiwandi Crime
Bhiwandi Crimex
Published On
Summary
  • चिमुरडीचे शोषण करणाऱ्या नराधमाला अटक

  • याआधीही लहान मुलीवर केले होते अत्याचार

  • अटकेनंतर फरार असताना पुन्हा केले दृष्कर्म

फैयाज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Bhiwandi News : भिंवडीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. याआधीही त्याने एका लहान मुलीवर अत्याचार केला होता. तेव्हा आरोपी पोलिसांच्या अटकेतून पळून गेला होता. पळाल्यानंतर त्याने बिहारमध्ये आश्रय घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये भिवंडी शहरातील फेणेगाव येथे आरोपीने सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो बिहारला पळून गेला. कठोर मेहनतीनंतर पोलिसांनी आरोपीला बिहार येथे जात अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले होते.

Bhiwandi Crime
26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

चिमुरडीची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयात हजर केले असताना आरोपी पळून गेला होता. न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत तो पसार झाला होता. फरार असताना त्याने पुन्हा एकदा एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार केला आणि तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली. लहान मुलींना लक्ष्य करुन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhiwandi Crime
BJP Leader Passes Away : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या, त्यानंतर तिची हत्या करणाऱ्या नराधमाला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी न्यायालयात हजर करताना हा आरोपी पोलिसांच्या अटकेतून पळून गेला होता. पळून गेल्यानंतर त्याने पुन्हा एका लहान मुलीचे शोषण केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा भिवंडी पोलीस तपास करत आहेत.

Bhiwandi Crime
Neet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय, स्वत:वर गोळी झाडत आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com