Congress Accuses Bjp Of Delaying Vote Counting For Evm Hacking saam tv
महाराष्ट्र

EVM हॅकिंगसाठीच मतमोजणी लांबणीवर'; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

Congress Alleges BJP Over Delay in Vote Counting: नगरपरिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी नागपूर खंडपीठाच्या आदेशानं पुढे ढकलली. मात्र मतमोजणी पुढे का ढकल्यात आली? काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर काय आरोप केलेत? आयोगापुढे ईव्हीएमच्या सुरक्षेचं आव्हानं का आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

  • बीड आणि चंद्रपूरमध्येही संतप्त मतदारानं ईव्हीएम फोडलं.

  • ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवल्याचा आरोप

  • आयोगाने मतमोजणी 19 दिवसांनी पुढे ढकललीय

ही घोषणाबाजी सुरुय बीडमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या बाहेर. कारण ईव्हीएमसाठीची सुरक्षा अपुरी असल्याचा आरोप करत पवारांच्या राष्ट्रवादीने नगरपरिषदेच्या बाहेर गोंधळ घातलाय. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबत कोणत्या अधिकाऱ्यांशी बोलायचं. असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित करताच पोलीसांनी मीडियाशी बोला असं अजब उत्तर दिलंय.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर फक्त बीडमध्येच नाही तर चंद्रपूरमध्येही संतप्त मतदारानं ईव्हीएम फोडलं. तर सांगलीच्या आष्टा नगरपरिषदेत एकूण मतदानापेक्षा तब्बल 2 हजार मतं अतिरिक्त झाल्यामुळे नागरिकांचा असंतोष उफाळून आलाय. एका बाजूला ईव्हीएमच्या सुरक्षेवरुन विरोधकांमध्ये असंतोष निर्माण झाला असताना दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी तर थेट ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवल्याचा आरोप केलाय. कारण भाजपनं २६४ पैकी १७५ नगरपरिषदांमध्ये विजय मिळवण्याचा अंतर्गत सर्व्हेत दावा केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Igatpuri Travel: कडाक्याची थंडी अन् दाट धुकं, इगतपुरीतील हे ठिकाण पर्यटकांसाठी ठरतय आकर्षण

EPFO: खासगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

Amol Kolhe : "यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..."; IndiGo एअरलाइनचा सावळा गोंधळ पाहून अमोल कोल्हे संतापले

Ravi Shastri: ROKO शी पंगा घेऊ नका नाहीतर...! रवी शास्त्रींनी कोणाला सुनावले खडे बोल?

Maharashtra Live News Update: शनीशिंगणापूर देवस्थानचे दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT