बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

EVM Machine Issue : पसंतीच्या उमेदवाराचं बटन दाबल्यानंतर भलतीकडे लाईट पेटल्यानंतर मतदाराने ईव्हीएम फोडल्याचे समोर आलं. या प्रकाराने मतदान केंद्रावर खळबळ उडाली.
EVM Machine Issue
EVM Machine Saam tv
Published On
Summary

नगरपालिकांच्या मतदानाच्या दिवशी सावळा गोंधळ

दिवसभरात उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

चंद्रपुरात मतदाराने ईव्हीएम फोडलं

राज्यातील विविध ठिकाणी नगरपालिकांच्या मतदानाच्या दिवशी सावळा गोंधळ पाहायला मिळाला. काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही भागातील मतदान क्रेंद्रावर मशीन देखील बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाल्याचं दिसून आलं. चंद्रपूरमध्ये एका मतदाराने थेट ईव्हीएम मशीनच फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चंद्रपूरच्या गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने ईव्हीएम फोडल्याचे समोर आलं. गडचांदूरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली. राम दुर्गे असं ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचे नाव आहे. त्याने पंसतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबलं. मात्र, यावेळी भलत्याच्या उमेदवाराच्या चिन्हाची लाईट लागली, असा आरोप ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराने केला.

EVM Machine Issue
मतदानाच्या दिवशी मोठा राडा; रायगडमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

ईव्हीएम फोडल्यानंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली. मतदारांमध्येही एकच पळपळ झाली. मतदान केंद्रावरील कर्मचारी देखील घाबरून गेले. या प्रकारानंतर पोलिसांनी राम दुर्गे याला ताब्यात घेतलं. नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

EVM Machine Issue
Pune Accident : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये भीषण अपघात; दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

भाजप उमेदवाराच्या पतीने बॅलेट युनिट उचलून फेकले

अकलूज नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान प्रक्रिया सुरू असताना धक्कादायक प्रकार घडला. बटन दाबले जात नाही, या कारणाने अंबादास पाटोळे या भाजप महिला उमेदवाराच्या पतीने बॅलेट युनिट उचलून फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर अकलूजमध्ये प्रभाग क्रमांक सात आणि परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. यानंतर प्रभाग क्रमांक ७ मधील क्रांतीसिंह माने पाटील या उमेदवाराने बॅलेट युनिट मशीनची तपासणी करून एक तास वाढीव मतदानाला वेळ द्यावा, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com