

महाडमध्ये मतदानाच्या दिवशी मोठा राडा
गावले समर्थक आणि जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा
गोगावले समर्थकांकडून जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड
रायगडमध्ये मतदानाच्या दिवशी मोठा राडा झाला आहे. रायगडमध्ये गोगावले समर्थक आणि जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. निवडणुकीत उभे राहिलेले विकास गोगावले आणि सुशांत समर्थकांमध्ये हाणामारी झाली. गोगावले समर्थकांनी जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली. या हाणमारीच्या घटनेमुळे रायगडमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरु आहे. रायगडच्या महाडमध्ये नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. महाडमध्ये या मतदानाच्या दिवशी सत्ताधारी कार्यकर्त्यांनीच गोंधळ घातला. रायगडमध्ये विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारीची घटना घडली. दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.
महाडमधील नवे नगर परिसरात ही हाणामारीची घटना घडली. सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण झाली आहे. तसेच सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप दिल्याची माहिती मिळत आहे. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बुथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असताना राडा झाला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, 'महायुतीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मैत्रीपूर्ण लढत करा अशा तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. भरत गोगावले यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं. महाडमध्ये झालेली हाणामारी भरत गोगावले यांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. भरत गोगावले यांचे मंत्रीपद अडचणीत आणण्याचं षडयंत्र आहे'.
'योग्य तपास करावा, विकास गोगावले आणि भरत गोगावले यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न आहे. विकास गोगावले यांना त्यांचे वडील मंत्री आहेत, यांचं भान होते. गोगावले यांना त्रास द्यायचा आहे म्हणून या गोष्टी होत आहेत. महाडमध्ये असं चालू ठेवणार आहात का, हे महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे,असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.