Manasi Parekh: नेपाळमधील पूरात अडकली, शेवटी...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभ

Manasi Parekh: कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान नेपाळमध्ये पूर आणि दरडी कोसळल्याने अभिनेत्री मानसी पारेख त्याठिकाणी अडकली होती. आता सुखरूप मुंबईत परतल्यानंतर कुटुंबीयांना भेटून ती भावूक झाली.
Manasi Parekh
Manasi ParekhSaam Tv
Published On

Manasi Parekh: नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण पूर आल्याने या पुरात अनेकांनी आपले जीव गमावले. यावेळी अनेक भारतीय तिथे अडकले होते. त्यांच्यापैकी अनेकांना सुखरुप भारातात परत आणले गेले आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी पारेख देखील होती. आता मानसी सुखरुप मुंबईत परतली आहे. ‘ईशा फाउंडेशन’द्वारे आयोजित कैलास मानसरोवर यात्रेसाठी ती गेली होती. मात्र, या प्रवासादरम्यान नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आणि ठिकठिकाणी झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे तिचा प्रवास अत्यंत कठीण झाला. या परिस्थितीमुळे मानसीच्या सुरक्षिततेबाबत चाहत्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

घरी परतल्यानंतर मानसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची सतत विचारपूस करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. गेल्या तीन-चार दिवसांचा काळ अत्यंत कठीण असल्याचे तिने सांगितले. चीनमधून बाहेर पडून नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचणे म्हणजे एखादी लढाई जिंकल्यासारखे असल्याचेही तिने म्हटले.

Manasi Parekh
Samay Raina Controversy: बिहारी-कश्मीरी विनोद समय रैनाला पडला महागात? भाजप-काँग्रेस नेत्यांनी सुनावले खडेबोल

मानसीने तिच्या प्रवासातील अनुभव सांगताना लिहिले, तिबेटमधील न्यालाम येथे दरड कोसळल्यामुळे आमचा प्रवास थांबला होता. यावेळी आम्हाला जवळपास चार तास बसमध्येच अडकून राहावे लागले. रस्ता मोकळा झाल्यानंतर आमचा ग्रूप नेपाळच्या दिशेने पुढे निघाला. मात्र, नेपाळजवळ पुन्हा दरड कोसळल्याने पुन्हा आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Manasi Parekh
Uttam Kumar: 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींना आली दिग्गज अभिनेत्याची आठवण; श्रद्धांजली वाहत सांगितला खास किस्सा

मानसीने पुढे लिहिले, रस्ता बंद असल्याने पुढील प्रवासासाठी आम्हाला ट्रेक करत जावे लागले. त्यानंतर काठमांडूला जाण्यासाठी बसने केलेला प्रवासही अत्यंत खडतर होता. चार तासांच्या या प्रवासानंतर अखेर मुंबईला परतता आल्याने आणि आपल्या कुटुंबीयांना भेटता आल्याने आता मला सर्वात जास्त आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com