Samay Raina Controversy: बिहारी-कश्मीरी विनोद समय रैनाला पडला महागात? भाजप-काँग्रेस नेत्यांनी सुनावले खडेबोल

Samay Raina Controversy: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’मधील बिहारीवर केलेल्या विनोदावरुन वाद निर्माण झाला आहे. आर. एस. पठानिया, मिथिलेश तिवारी यांच्यासह नेत्यांनी टीका केली, तर संजय सिंग यांनी संयमाचे आवाहन केले.
Samay Raina Controversy
Samay Raina ControversySaam Tv
Published On

Samay Raina Controversy: प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या दुसऱ्या सीझनमध्ये एका सेगमेंटमधील संभाषणावरून हा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी समय रैना यांच्यावर टीका केली आहे. बिहार आणि काश्मीरशी संबंधित विनोदांवरून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

या सेगमेंटमध्ये ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक शॅरन वर्मा पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाली होती. त्यांच्यासोबत समय रैना, ओरी, अर्चना पूरण सिंग आणि निशांत सुरी हे देखील उपस्थित होते.

Samay Raina Controversy
Uttam Kumar: 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींना आली दिग्गज अभिनेत्याची आठवण; श्रद्धांजली वाहत सांगितला खास किस्सा

नेमका वाद काय?

संभाषणादरम्यान समय रैना यावेळी शॅरन वर्माला म्हणाला शॅरन कामासाठी बिहार सोडून मुंबईत आली आहे जस्ट लाईक बिहारी थिंक्स यावर शॅरनने समय यांच्या काश्मिरी पार्श्वभूमीचा आधार घेत प्रत्यूतर देत म्हणाली किमान मी माझं राज्य माझ्या इच्छेने सोडलं आहे. या संभाषणातील क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. आता त्यांच्या या वादावरुन नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Samay Raina Controversy
Tyanchi Vari: मराठी सिनेसृष्टीत नवा प्रयोग! भारतात पहिल्यांदाच AIच्या मदतीने बनलेला 'त्यांची वारी' होणार प्रदर्शित

नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

नागरिक आणि विविध समुदायांबद्दल केलेल्या अवमानकारक विधानांवर बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनीही आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, "आपल्या देशातील कोणत्याही नागरिकाविरुद्ध केलेले अवमानकारक विधान खपवून घेतले जाणार नाही. जे लोक अशी विधाने करतात, ते मूलतः देशाला विभागण्याबद्दलच बोलत असतात. आमच्यासाठी राजा आणि सामान्य नागरिक समान आहेत आणि देशात जात किंवा धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव होता कामा नये. हीच भाजपची स्पष्ट भूमिका आहे."

काँग्रेस नेते हरीश रावत यांनी म्हटले आहे की, कॉमेडियनने आपल्या विनोदात विशिष्ट समुदाय किंवा प्रदेशांचा उल्लेख करताना काळजी घेतली पाहिजे. ते म्हणाले, "विनोद ही एक दैवी कला आहे जी उत्साह वाढवते, मन प्रसन्न करते आणि चिंतेचा भार हलके करते. मात्र, जेव्हा तिचा वापर एखाद्या जाती, समुदाया किंवा प्रदेशाला अपमानास्पद किंवा उपहासात्मक पद्धतीने दर्शवण्यासाठी केला जातो, तेव्हा त्या विनोदाचे अनर्थ होतो. समय रैना यांनी ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे."

आप (AAP) नेते संजय सिंग म्हणाले, "मला वाटते की जेव्हा एखादा कॉमेडियन असे काही बोलतो, तेव्हा लोकांचे मनोरंजन करणे हाच त्याचा उद्देश असतो. या प्रक्रियेत चुका होऊ शकतात. तरीही, याचे मोठे प्रकरण बनवणे किंवा त्याला टार्गेट करणे योग्य नाही असे मला वाटते. त्याऐवजी, त्याच्याशी संवाद साधून त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे."

भाजपचे आमदार आर. एस. पठानिया यावर प्रतिक्रिया, "भारताची एक सामूहिक मूल्यव्यवस्था आणि भावना आहे. भारताला एक इतिहास, परंपरा आणि उज्ज्वल भविष्य लाभले आहे. समय रैना यांना अशा प्रकारच्या खोडकर वर्तनाबद्दल यापूर्वीही दंड ठोठावण्यात आला आहे; तरीही त्यांनी कायदा, संविधान आणि सामाजिक नैतिकतेच्या संकेतांकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा तशीच विधाने केली आहेत. आम्ही याचा निषेध करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com