Maharashtra News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचे शिष्टमंडळ येणार!
Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे उपोषण, राज्यात पावसाची उसंत, शिवसेना कुणाची, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मारबत महोत्सवाचे आयोजन.
- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मारबत महोत्सवाचे आयोजन.
- महापौर निता ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निमंत्रण.
- नागपूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा मनपाचा प्रयत्न.
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचे शिष्टमंडळ येणार!
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे
दरम्यान आज सरकारचे शिष्ट मंडळ आंतरवाली सराटी मध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे