BJP vs Shivsena Saam Tv
महाराष्ट्र

आघाडीची डोकेदुखी पुन्हा वाढली; विधानपरिषद निवडणुकीतही भाजपची मोठी खेळी

विधानपरिषद निवडणुकीत भाजप पाच उमेदवार देणार असल्याची माहिती आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपने (BJP) सातवा उमेदवार देऊन महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) टेन्शन वाढवलं आहे. त्यातच आता विधान परिषद निवडणुकीतही (Maharashtra Legislative Council) महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजप पाच उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Legislative Council Latest News)

भाजपकडून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. तर उर्वरित तीन जागांसाठी चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, कृपाशंकर सिंह यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. पाचव्या जागेसाठी राम शिंदे किंवा कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. येत्या दोन ते तीन दिवसात भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र भाजपच्या वतीने या नावांची यादी दिल्लीत पाठवली असल्याची माहिती आहे. दरम्यान, याआधीच राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार देऊन महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे. त्यातच आता विधान परिषद निवडणुकीतही भाजपकडून पाच उमेदवार देणार असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १० जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्यासाठी १३ जूनची मुदत असेल. २० जून रोजी मतदान पार पडेल. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. २० जून रोजी सायंकाळी ५ नंतर मतमोजणी होईल. त्यावेळी विधान परिषदेचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

विधानसभेचं गणित काय?

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता १५ तर भाजपला २० मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष व अपक्ष अशा २९ मतांवर शिवसेना व भाजपची भिस्त असेल. यातूनच ‘घोडेबाजार’ म्हणजेच आमदारांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच भाजप की शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होतो वा काँग्रेसला फटका बसतो याची उत्सुकता असेल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

Saiyaara: 'सैयारा' चित्रपटासाठी 'ही' बॉलिवूडची फेमस जोडी होती पहिली पसंती

Maharashtra Live News Update: - जायकवाडीच्या नाथसागरात जलपूजन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT