Rahul Narvekar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : यंदा विरोधी पक्षनेता असणार की नसणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोजक्या शब्दात सांगितलं

rahul narvekar Latest News : यंदा महाविकास आघाडींना जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे यंदा विरोधी पक्षनेता असणार का,याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. महायुतीने २३० जागा पटकावल्या. महायुतीच्या त्सुनामी महाविकास आघाडीला ५०च्या आत गुंडाळलं. महायुतीच्या जोरदार यशामुळे महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी देखील संख्याबळ उरलं नाही. त्यामुळे यंदा विधानभवनात विरोधी पक्षनेतेपद असणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल नार्वेकर म्हणाले, 'आज माझी बिनविरोध निवड झालेली आहे. राज्यात १३ कोटी जनतेचं नेतृत्व करणाऱ्या लोक प्रतिनिधींना मी बोलण्याची संधी देईल'.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत राहुल नार्वेकर म्हणाले, 'नियमात जे असेल, त्यानुसार संधी देईन. सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून त्यांनी मतदान केलं. त्यांच्यावर अन्याय करू नका. मी जनतेच्या कोर्टात गेलो. मला ५० हजारांचे लीड मिळाले. जे टीका करतात, त्याकडे मी लक्ष देणार नाही. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांना बोलण्याची संधी देईन'.

'कामकाज सल्लागार समितीत त्यांची संख्या बसत नसताना देखील मी त्यांना समितीत सामावून घेतलं आहे. सर्व बैठका योग्य रित्या होतील. मागील अडीच वर्षाचा तपशील बघितला तर, आम्ही रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे., असे नार्वेकर म्हणाले.

दरम्यान, सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी राहुल नार्वेकर म्हणाले, 'सतीश वाघ यांचा विषय गंभीर आहे. कायदा सुव्यस्था योग्य असायला हवी. मला खात्री आहे, पोलीस यंत्रणेबाबत सखोल चौकशी करतील'.

अंबादास दानवे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काय म्हणाले?

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, ' आता बाकीच्या मंत्र्यांचा जाऊद्या. परंतु या तीन जणांनी शपथ घेतलेली आहे. त्यांच्याकडे देखील खाते आले नाहीत. परंतु आता झोपू मुख्यमंत्री आहेत, ते फक्त नामधारी आहेत. त्यांच्याकडे कुठलेही खात्याचं काम नाही. या सरकारला स्वतःचे प्रश्न सोडवणे अवघड जात आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT