

रोहित कदम, साम प्रतिनिधी
कृषी खात्यानं शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिलेलं मोफत बियाणं बोगस निघालेलं असताना आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय. नाशिकच्या कंपनीचा बोगस खतांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकानं पकडलाय. मेसर्स गौरीइन्झी सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून मार्केटिंग केलेला बायो डीएपी खतांचा तब्बल 2.5 मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आलाय.
विशेष म्हणजे, खत विक्रीची परवाना नसलेल्या कंपनीचे मालक, मार्केटिंग आधिकारी आणि साठवणूक करणाऱ्या अशा 5 जणांविरोधात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे, ऐन खरीप हंगामात पीकं वाचवण्यासाठी खतांची गरज असतानाच फसवणूक झाल्यानं शेतकरी चांगलेच संतापले आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीचे प्रकार समोर येत आहेत. बोगस कंपन्यांवर गुन्हे दाखल करून क़डक कारवाई करणार असल्याचं कृषी आयुक्तांनी सांगितलंय. खरंतर, खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना खतांच्या टंचाईनं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. विक्रेत्यांकडील खतांचा साठा संपल्यानं शेतकऱ्यांना वणवण देखील फिरावं लागलं होतं.
इतकंच नव्हे तर खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूटही सुरू होती. मात्र, आता खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बोगस बियाणांसह बोगस खतांची विक्रीही समोर आलीये. त्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना आर्थिक संकटात ढकलणाऱ्या बोगस कंपन्यांविरोधात सरकारनं कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.