कोरोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्र ठरला अव्वल Saam Tv
महाराष्ट्र

कोरोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्र ठरला अव्वल

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

Krushnarav Sathe

नवी दिल्ली : कोरोना महामारी विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत देशभरातील लसीकरणाच्या तुलनेत महाराष्ट्र देशभरातील लसीकरणाच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

हे देखील पहा -

देशातील एकूण ५५ कोटी ४७ लाख ३० हजार नागरिकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. टक्केवारीच्या स्वरुपात लोकसंख्येच्या ३२.४ टक्के लोकांना एक डोस मिळाला असून, ९.१ टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. केरळ राज्यातील दीव-दमण, वायनाड, भुवनेश्वर व लडाख या चार शहरांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे. या चारही ठिकाणच्या सर्व नागरिकांनी लसीचा किमान एक तरी डोस घेतलेला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या सर्वाधिक लसीकरणात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत तब्बल ५ कोटी ९८ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात ५ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, लसीकरण आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर विचारात घेतले असता उत्तर प्रदेश हे लसीकरणात सर्वांत पिछाडीवर असलेले राज्य ठरते.

कारण तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त ३१ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. महाराष्ट्रासह,तमिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, झारखंड ही राज्ये उत्तर प्रदेशाच्या पुढे आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक कोटींवर गेलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

SCROLL FOR NEXT