मुंबई : शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणेंना आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मैदानात जोरदार सक्रीय करण्याची खेळी चालवली आहे. याचाच भाग म्हणून राणेंच्या मुंबईतील जन आशीर्वाद यात्रेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. मात्र शिवसेनेकडून राणेंच्या या यात्रेला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.
हे देखील पहा -
आज नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी नारायण राणे आज सकाळी १० वाजता मुंबई विमातळावर दाखल होतील. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा वांद्रे, दादर, सायन, प्रभादेवी, परळ या शहरातील प्रमुख भागात असणार आहे.
सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पण या जन आशीर्वाद यात्रेसाठी निवडण्यात आलेल्या या जागा म्हणजे शिवसेनेचे प्राबल्य असणारी ठिकाणे आहेत. विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्यासाठी नारायण राणे जाणार आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणे यांना कोणताही अधिकार नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आक्षेप घेतलाय.
भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कात शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची जनआशीर्वाद यात्रा संघर्ष यात्रा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे परिसरात जागोजागी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.