Maharashtra Farmer End Life  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmer: दुर्दैव! शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक!, दररोज ७ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

Priya More

राज्यातील शेतकरी संकटामध्ये आहे. दुष्काळ, नापिकी, पावसामुळे पिकाचे नुकसान, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशामध्ये राज्यातील शेतकरी आत्महत्येची (Farmer End Life) चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात दररोज ७ शेतकऱ्यांनी आयु्ष्य संपवले आहे. राज्यात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी खूपच चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये ४ महिन्यात ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर नागपूर विभागात ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्या आहेत. या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर दुसरीकडे ८३८ पैकी यात १७१ शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली.

राज्यात आतापर्यंत फक्त १०४ शेतकऱ्यांनाचं १ लाख आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर ६०५ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. राज्यात आरोप प्रत्यारोप आणि पळवा पळवीच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधीना वेळ नाही ? असा सवाल शेतकरी कुटुंबियांकडून केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : तिसऱ्या आघाडीवर शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी, राजू शेट्टी संतापले; म्हणाले...

Pune Shocking News : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईची हत्या; पुण्यातील खळबळजनक घटना

Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नांग्या ठेचणार, रोहीत पवारांची जहरी टीका

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगाव दौरा रद्द

Pravin Tarde : आता शिव्या द्यायच्या झाल्या तरी मराठीत द्या; प्रवीण तरडे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT