Rashmika Mandanna: 'पदरावर देवी, हातावर मेंहदी...'; रश्मिका मंदान्नाच्या मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो व्हायरल

Shruti Vilas Kadam

मेहंदी समारंभ

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिकाचा पारंपरिक आणि आकर्षक लूक चाहत्यांना विशेष आवडला.

Rashmika Mandanna | Saam tv

डिझायनर करण तोराणी

उदयपूरमध्ये पार पडलेल्या मेहंदी समारंभात रश्मिकाने डिझायनर करण तोराणी यांच्या लेबलची मल्टीकलर साडी परिधान केली होती. या साडीच्या पल्लूवर देवी लक्ष्मीची नक्षी काढलेली होती, ज्यामुळे तिचा लूक अधिक उठून दिसत होता.

Rashmika Mandanna | Saam tv

हॉल्टर नेक ब्लाऊज

साडीबरोबर रश्मिकाने हॉल्टर नेक ब्लाऊज परिधान केला होता. पारंपरिक साडी आणि मॉडर्न ब्लाऊजचा सुंदर संगम तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळाला.

Rashmika Mandanna | Saam tv

धार्मिक चिन्हांची मेहंदी

रश्मिकाच्या हातांवर काढलेली मेहंदीही विशेष आकर्षण ठरली. तिच्या मेहंदीमध्ये कमळाचे फूल, चंद्र, त्रिशूल आणि ‘ॐ’ यांसारख्या धार्मिक चिन्हांची सुंदर नक्षी करण्यात आली होती.

Rashmika Mandanna | Saam tv

विजय देवरकोंडा

मेहंदी समारंभात विजय देवरकोंडाही हटके अंदाजात दिसला. त्याने मल्टीकलर एथनिक ब्लेझरसोबत निळ्या रंगाची धोती आणि कंबरबंध असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

Rashmika Mandanna | Saam tv

सासूंसमोर हात जोडून

समारंभातील फोटोंमध्ये लग्नातील काही पारंपरिक विधींची झलकही पाहायला मिळाली. एका फोटोमध्ये विजय सासूंसमोर हात जोडून नम्रतेने बसलेला दिसतो.

Rashmika Mandanna | Saam tv

आभार

हे फोटो शेअर करताना रश्मिकाने मेहंदीचा हा खास क्षण खूप सुंदर असल्याचे सांगितले आणि आपला पोशाख डिझाइन करणाऱ्या डिझायनरचेही आभार मानले.

Rashmika Mandanna | Saam tv

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी

Social Media Use | Saam tv
येथे क्लिक करा