Samruddhi Expressway Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Infrastructure: समृद्धी महामार्गाला आणखी एक एक्सप्रेसवे जोडणार, नाशिक-मुंबईचा प्रवास आणखी सुसाट होणार, वाचा सरकारचा मास्टरप्लान

Samruddhi Expressway and Mumbai Eastern Freeway Join: समृद्धी महामार्ग आता थेट मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेला जोडला जाणार आहे. यामुळे प्रवास सुसाट होणार आहे.

Siddhi Hande

समृद्धी एक्सप्रेस वे थेट ईस्टर्न फ्रीवेला जोडला जाणार

आमणे फाट्यावरुन अजून एक मार्ग तयार होणार

नाशिकवरुन मुंबई फक्त सव्वा दोन तासात

समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जलद झाला आहे. आता समृद्धी महामार्ग मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. नागपूर- मुंबईच्या समृद्धी महामार्गावरुन आमणे फाट्यापर्यंत जलद पोहचतो. मात्र, आमणे फाट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोडींमुळे पुढे मुंबईकडे जाण्यासाठी उशिर होतो. याचमुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमणे फाट्यावर अजून एक मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय मुंबई गाठता येणार आहे.

आमणे फाट्यावरुन नवीन मार्ग

नाशिकवरुन येणाऱ्या वाहनधारकांना आमणे फाट्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आमणे फाट्यावरुन एक नवीन मार्ग इस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई-नाशिक प्रवास हा अवघ्या दोन तासातच होणार आहे, याबाबत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. यामुळे समृद्धी महामार्गाने मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना फायदा होणार आहे.

वाहतूक कोंडी फुटणार

नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. समृद्धी महामार्ग भिवंडी येथील आमणे येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या महामार्गावर आमणे येथे मुंबईत प्रवेश करताना वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवाससाठी सात ते आठ तास लागतात. यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेचा वापर करतात. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांनी हा निर्णय घेतला आहे.

नाशिकवरुन सव्वा दोन तासांत मुंबई

समृद्धी महामार्ग आमणे फाट्यावरुन थेट ईस्टर्न एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच मुंबईत लवकरात लवकर पोहचता येणार आहे. नाशिककर फक्त सव्वा दोन तासात मुंबईत येतील, यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT