Nagpur Farmer Protest Latest News : बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा नागपूरमध्ये पोहचलाय. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून टायर पेटवून रस्ता रोखला आहे. मागील दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे.
मात्र, सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही. आज संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे. "सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक घडवून आणू. असा इशारा सरकारला दिला आहे.
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, यासाठी कडू आक्रमक झाले आहेत. कर्जमाफी दिली नाही, तर रस्ते जॅम करू, रेल्वे ठप्प करू असा इशारा कडूंकडून देण्यात आला आहे. मुंबईत चर्चेसाठी या, असे म्हणत सरकारने त्यांच्याकडे चर्चेसाठी आमंत्रण पाठवले आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. मुंबईमध्ये चर्चेसाठी या, असे बावनकुळे यांनी विनंती केली. त्यावर चर्चा नागपुरात करा, मुंबईला येणार नाही असे थेट कडूंनी सांगितले. कर्जमाफीवर ठाम, काही विषय हे शासनाचे जीआर काढून होईल,नाहीतर आंदोलनासाठी जाऊ, रेल्वे रोखण्यात येईल, रस्ते ठप्प करू, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री यांच्यासोबतच नागपुरात बैठक लावा, इथून हटलो तर आंदोलन परिणाम होईल, त्यामुळे नागपुरात चर्चा करा, खऱ्या शेतकरी यांना कर्जमाफी करा, आमदार खासदार यांना कर्जमाफी देऊ नका. अर्धा तास वाट पाहू, नाहीतर आम्ही रेल्वे रोखायला निघू, असे कडू म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.