Maharashtra in weather Yandex
महाराष्ट्र

Maharashtra weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका; मराठवाड्यात यलो, तर विदर्भात गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather Forecast : राज्यात आजही पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

Bharat Jadhav

Maharashtra Weather Update :

गेल्या आठवड्यापासून देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे. मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावलीय. आज पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे.(Latest News)

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात आजही पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीय.

आज विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आलाय. मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळ आणि ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालाय. मंगळवारी रात्री दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस बरसला.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खडकी बोरगाव, मोय खेडा दिगर, फतेपूर् फेक्री या गावांना मंगळवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि अकोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर पातुर तालुक्यातल्या मळसुर भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT