Shocking : जन्मदाताच झाला हैवान! पोटच्या मुलींवर अत्याचार; नागपूर, शिरूरमधील घटनांनी महाराष्ट्र हादरला

Maharashtra Crime News : नागपूर आणि पुण्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस. नागपुरात सावत्र बापावर, तर पुण्यात वडिलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू.
Maharashtra Crime News
Maharashtra Crime News AI Image
Published On: 
Summary
  • नागपूर आणि पुण्यात धक्कादायक घटना

  • दोन वेगवगेळ्या घटनेत जन्मदात्या बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना

  • पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सोसह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

बाप मुलीच्या नात्याला कलंक फासणारी घटना नागपूर आणि पुणे जिल्ह्यात घडली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील वेगवगेळ्या घटनेत पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा जलद गतीने तपास करत आहेत. दरम्यान नागरिकांनी आरोपींना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

नागपूरमध्ये बाप लेकीच्या नात्याला कलंक

पहिल्या घटनेत नागपूरच्या पाचपावली परिसरात १० वर्षाच्या मुलीवर ४५ वर्षीय सावत्र बापाने वारंवार अत्याचार केले. मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा दिसल्यानंतर महिलेला पतीवर संशय आला. त्यानंतर पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पीडितेच्या आईने टीव्हीच्या मागे गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. हा कॅमेरा जवळपास वर्षभर घरात लावला होता. महिलेने या कॅमेऱ्यातील हालचालींचे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डिंग करून मैत्रिणीच्या मोबाईलवर लाईव्ह फुटेज पाहण्याची व्यवस्था केली होती. याद्वारे ती घरातील हालचालींवर लक्ष ठेवायची.

Maharashtra Crime News
Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

मुलीने घडलेला प्रकार सांगितला

काही दिवसाने महिलेने मुलीला जवळ घेऊन तिची विचारपूस केली असता तिनेही घाबरून न जाता आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या जबाबानंतर महिलेने पुराव्यासकट पोलीस ठाण्यात धाव घेतली. काही दिवसाने महिलेने मुलीला जवळ घेऊन तिची विचारपूस केली असता तिनेही घाबरून न जाता आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या जबाबानंतर महिलेने पुराव्यासकट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या जबाबावरून आणि मिळालेल्या पुराव्यांवरून बलात्कार, गंभीर लैंगिक अत्याचार, धमकी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले.

Maharashtra Crime News
Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

पुण्यातही जन्मदाता बाप बनला हैवान

दुसरी संतापजनक घटना पुण्यातील शिरूर परिसरात घडली आहे. ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही, तर या अत्याचाराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये सेव्ह केले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मागच्या एक वर्षापासून हा अत्याचार सुरू होता. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा विचार करून तिची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडितेला न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी या घटनांनी शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.