Saam TV News
गिरगाव मधील ही एक अतिशय जुनी, पारंपरिक आणि शांत वस्ती आहे. इथे पोर्तुगीज वास्तुकलेचे दर्शन घडवणारे लाकडी बंगले, अरुंद गल्ल्या आणि जुन्या मुंबईची झलक पाहायला मिळते.
अंधेरी पश्चिम, मुंबई येथे असलेला हा सुमारे २०० फूट उंच काळ्या बेसाल्ट खडकाचा एक भव्य सुळका आहे. या हिलच्या शिखरावर दोन जुनी मंदिरे गौतमी माता आणि दुर्गादेवी.
मलबार हिल दक्षिण मुंबई येथील हा एक प्राचीन पाण्याचा तलाव आहे. या आयताकृती तलावाच्या चारही बाजूंनी पायऱ्या, जुनी मंदिरे आणि धर्मशाळा आहेत. हा मुंबईतील एक अत्यंत पवित्र आणि धार्मिक वारसा आहे.
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात असलेली ही प्राचीन बौद्ध लेणी आहे. येथे सुमारे १०९ पेक्षा जास्त लहान-मोठी लेणी आहेत, ज्यामध्ये प्रार्थनागृहे , विहार, दगडात कोरलेली गौतम बुद्धांची शिल्पे आणि जुने दगडी खाटले पाहायला मिळतात.
अंधेरी पूर्व येथे असलेली ही लेण्याची एक छोटी मालिका आहे, ज्यांना कोंडिविटे लेणी असेही म्हणतात. येथे एकूण १९ लेणी आहेत, ज्यात प्रामुख्याने स्तूप, बुद्धांची शिल्पे आणि प्राचीन पाली भाषेतील शिलालेख पाहायला मिळतात.
शिवडी मध्य मुंबई येथील हा किल्ला पूर्व किनारपट्टीजवळ खाडीच्या कडेला वसलेला आहे. विशेषतः हिवाळ्यात या किल्ल्याच्या आजूबाजूच्या शिवडी खाडीच्या परिसरात हजारो फ्लॅमिंगो पक्षी पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी मोठी गर्दी करतात.
गोरेगाव पूर्व येथील आरे मिल्क कॉलनीमध्ये असलेला हा एक सुंदर आणि हिरवागार परिसर आहे. येथे लहान मुलांसाठी फिरण्याची जागा, तसेच पर्यटकांसाठी नौकाविहार करण्याची सोय आहे. हा भाग चित्रपट शूटिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे.
बोरिवली-गोराई खाडीच्या जवळ असलेला हा अत्यंत भव्य असा पांढऱ्या आणि सोन्याच्या रंगाचा विपश्यना मेडिटेशन स्तूप आहे. येथे गौतम बुद्धांचे अवशेष ठेवण्यात आले आहेत. हजारो लोकांना एकत्र ध्यान करण्यासाठी हा पगोडा ओळखला जातो. येथील शांत,दिव्य वातावरण आणि सुंदर वास्तुकला मनाला आणि डोळ्यांना सुखावणारी आहे.
NEXT : पाण्यात की दुधात, ड्रायफ्रुट्स कशामध्ये भिजून खावे?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.