

Virat Kohli and Rohit Sharma race for second spot in ODI Rankings : आयसीसीनं पुन्हा एकदा रँकिंग अपडेट केलीय. भारताचा कर्णधार शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल हा शर्यतीत असला तरी, रेटिंगमध्ये अंतर खूप आहे. स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात शर्यत लागली आहे. दोघांच्याही रेटिंगमधलं अंतर खूप कमी आहे. रँकिंगमधील अव्वल पाच खेळाडूंमध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका सुरू असतानाच आयसीसीनं नवीन रँकिंग जाहीर केलीय. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल ८२२ रेटिंगसह अव्वल स्थानी कायम आहे. त्याची रेटिंग घटलीय. याआधी त्याची रेटिंग ८४१ होती. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलला खातंही उघडता आलं नाही. त्यामुळं रेटिंग घटलीय. दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ७९४ इतके आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रँकिंगमध्ये अटातटीची स्पर्धा सुरू आहे. विराट कोहली ७८१ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा ७५४ रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने शुभमन गिल खेळणार नाही. तो कसोटी मालिकेच्या तयारीला लागला आहे. पण रोहित आणि विराट दोघेही खेळतील. या दोघांनी मोठ्या खेळी केल्या तर, दुसऱ्या स्थानी असलेल्या मिचेलला मागे टाकण्याची संधी असेल. मिचेलही उर्वरित मालिकेत खेळणार आहे. पण गिलला मागे टाकू शकेल, अशी शक्यता खूप कमी आहे.
भारतीय टी २० संघाचा कर्णधार आणि वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरचं मात्र नुकसान झालंय. तो ६०८ रेटिंग पॉइंटसह १८ व्या स्थानी घसरलाय. आता गिल पुढचे सामने खेळणार नाही. आता श्रेयस कर्णधार असेल. संधी मिळाली तर, तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. त्यामुळं मोठी खेळी करेल अशी अपेक्षा आहे. भारतानं तीनपैकी दोन सामने जिंकून वनडे मालिकेत आघाडी घेतलीय. एक सामना पावसामुळं रद्द करण्यात आलाय. आता पुढचा वनडे सामना शुक्रवारी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.