shambhuraj desai
shambhuraj desai saam tv
महाराष्ट्र

Satara: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; आराेपीस कठाेर शासन हाेईल : गृहराज्यमंत्री

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यामधील महिला वन कर्मचाऱ्याला मारहाण करणा-यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी दिली. संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून यामधून आरोपी सुटणार नाही अशी ग्वाही मंत्री देसाईंनी दिली आहे.

देसाई म्हणाले (shambhuraj desai) सातारा (satara) जिल्ह्यातील महिला वनकर्मचारी या व्याघ्र गणनेचा काम करण्यासाठी दोन स्थानिक मजुरांना घेऊन त्या ठिकाणी सरकारी कामकाज करत होत्या. त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जानकर यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्या कामात अडथळा आणला. लाथाबुक्क्यांनी मारले अशा पद्धतीची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्याकडे बुधवारी दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत २४ तासात संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्यामध्ये आरोपीला कठोर शासन करण्याच्या दृष्टीने जे करावे लागेल ते तपासामध्ये आम्ही करू शिवाय आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाहीत अशा पद्धतीने कठोर भूमिका ही पोलिस घेतील अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT