Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Lok Sabha Election 2024 : फडणवीसांनी पहिल्या डावात विजयसिंहांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत आणलंय आणि दुसऱ्या डावात शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांना गळाला लावलंय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

अखेर माढ्याच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांनी दोन डाव टाकून शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटलांना धोबीपछाड दिलाय. फडणवीसांनी पहिल्या डावात विजयसिंहांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत आणलंय आणि दुसऱ्या डावात शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांना गळाला लावलंय.

दरम्यान विजयसिंह मोहिते पाटलांना धक्का दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जुन्या उपकाराची आठवणही करून दिली.. मोहिते पाटील यांचं राजकारण पवारांनी संपुष्टात आणलं, तेव्हा भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता..आता मोहिते पाटलांनी काय करायचं हे त्यांनी ठरवावं, असंही फडणवीसांनी म्हटलंय. दुसरीकडे फडणवीस अभिजीत पाटील यांच्या रुपाने शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.. माढा आणि सोलापूर मतदारसंघातील राजकीय गणितं बदलण्याची क्षमता असलेले अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

अभिजीत पाटलांची राजकीय ताकद किती?

माढा, सोलापुरात अभिजीत पाटील यांचं चांगलं वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही पाटील शरद पवारांच्या पाठिशी ठामपणे पाठिशी राहिले. मात्र अभिजीत पाटील यांचा विठ्ठल साखर कारखाना अडचणीत आहे. त्यांच्या कारखान्यावर शिखर बँकेनं दोन दिवसांपूर्वीच जप्तीची कारवाई केली. कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटील भाजपमध्ये जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजप अभिजीत पाटलांना बांधून घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांना पंढरपुरी हिसका दाखवा असं आवाहन जयंत पाटलांनी मतदारांना केलंय.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

माढ्यात शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर करून भाजपला जोरदार धक्का दिला.. उत्तम जानकरांनाही सोबत घेऊन अजित पवारांचीही डोकेदुखी वाढवली होती.. त्यामुळे माढ्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा होती.. मात्र अनेक दिवसांपासून सबुरीची भूमिका घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अखेर माढ्यात डाव टाकलाच... आता शरद पवारांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com