Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Ajit Pawar: राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवारांमधील लढतीमुळे बारामतीची सीट तर प्रतिष्ठेची बनलीय. मतांसाठी नेतेमंडळी साम- दाम- दंड- भेद असे सर्व हातखंडे आजमवत आहेत.
Sanjay Raut On Ajit Pawar
Sanjay Raut On Ajit PawarSaam Tv

Sanjay Raut On Ajit Pawar:

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवारांमधील लढतीमुळे बारामतीची सीट तर प्रतिष्ठेची बनलीय. मतांसाठी नेतेमंडळी साम- दाम- दंड- भेद असे सर्व हातखंडे आजमवत आहेत. अशातच बारामती शिरुरमध्ये अजित पवार मतदारांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय यांनी केलाय.

बारामतीच्या सभेतून संजय राऊतांनी अजितदादांवर घणाघाती आरोप केलेत. दुसरीकडे अजित पवारांनी सत्तेचा वापर करून लोकांना धमकावलं नाही, असं म्हटलंय. संजय राऊत म्हणाले आहेत की, ''बारामती आणि शिरूर मतदारसंघात स्वतः अजित पवार धमकी देत आहेत, तेही जाहीरपणे. गावागावात लोकांना ते धमकी देत आहेत. ते सांगता आहेत माझं आणि माझ्या पत्नीचं काम लारायचं, नाही तर नोटीस पाठवू.''

Sanjay Raut On Ajit Pawar
Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

संजय राऊत अजित पवारांवर फक्त धमकीचे आरोप करून थांबले नाहीत. तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांनाही धारेवर धरलंय. आम्हाला फक्त शरद पवारांना संपवायचंय, असं खुलं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी दिलं होतं. यावरून संजय राऊत यांनी टोला लगावत म्हटलं आहे की, आले किती गेले किती भरारा, पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा.

Sanjay Raut On Ajit Pawar
Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

दरम्यान, दिवसागणिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचताना दिसतोय. बारामतीत काका- पुतण्याच्या लढतीवर स्वत: मोदी-शाह लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या ताफ्यातली राऊतांची तोफ मैदानात उतरलीय. आता भाजपकडून अजितदादांना नेमकी काय रसद पुरवली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com