Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Rahul Gandhi On PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा असून नरेंद्र मोदी त्यांचे नेते आहेत, अशी टीका त्यांनी एका निवडणूक सभेत केली आहे.
Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi Criticized PM ModiSaam Tv

Rahul Gandhi On PM Modi:

लोकसभा निवडणुकीच्याचा तिसरा टप्प्याला सुरुवात झाली आहे. अशातच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा असून नरेंद्र मोदी त्यांचे नेते आहेत, अशी टीका त्यांनी एका निवडणूक सभेत केली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आरक्षण विरोधी भाजपमध्ये सामील होत आहेत: राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, आज आरएसएस प्रमुखांचे विधान येते की, ते आरक्षणाच्या विरोधात नाहीत. ते म्हणाले की, याआधी ते (भाजप) म्हणाले होते की, हे लोक आरक्षणाच्या विरोधात आहेत. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आज जो कोणी आरक्षणाच्या विरोधात आहे, ते भाजपमध्ये सामील होत आहेत. ते म्हणाले की, भाजपला देशातील दोन डझनहून अधिक अब्जाधीशांना मदत करायची आहे.

Rahul Gandhi Criticized PM Modi
Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

ओडिशा सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

ओडिशातील बिजू जनता दल (बीजेडी) भाजपच्या सहकार्याने सरकार चालवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी म्हणाले आहेत की, ते (बीजेडी आणि भाजप) वैवाहिक संबंधात आहेत. तुम्ही याला लग्न म्हणा किंवा भागीदारी म्हणा, पण सत्य तेच आहे. दिल्लीचे काका आणि नवीन बाबू यांनी हातमिळवणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. हे लोक देशातील मूठभर अब्जाधीशांसाठीच काम करत आहेत.

Rahul Gandhi Criticized PM Modi
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

बीजेडीने ओडिशात अनेक घोटाळे केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राज्य सरकारने लोकांच्या मालमत्तेची चोरी करून 9 लाख कोटी रुपयांची खनिज संपत्ती लुटली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास हा पैसा जनतेला परत करण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com