Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

Sharad Pawar on Pm Modi: आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत: शरद पवार
Sharad Pawar on Pm Modi
Sharad Pawar on Pm ModiSaam Tv

Sharad Pawar on Pm Modi:

>> हिरा ढाकणे

आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे. या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मंचकावर उपस्थित होते.

Sharad Pawar on Pm Modi
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

शरद पवार म्हणाले की, ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार, अशी भाषणाला सुरुवात करतील. दिल्लीत सांगतात की, शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत केली. बारामतीत येऊन म्हणतात बोट धरून आलो, असं सांगतात आणि ८ महिन्यात निवडणुकीमध्ये वेगळं भाषण करतात. भाषणात सातत्य असलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar on Pm Modi
Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, पुरंदरमधील लोकांनी नेहमी साथ देतात. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या का? लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते. ४०० पार करण्याचा अर्थ असा आहे, त्यांना वाटेल ते त्यांना करायच आहे. त्यांना संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना ४०० जागा पाहिजे आहेत. नरेंद्र मोदींची धोरण काय आहेत यातून कळते, त्यामुळे अधिक या निवडणुकीत लक्ष देण्याची गरज आहे, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू. नुसती तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आपली खून आहे. देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आपली आहे. बांगलादेश सारखा देश आपल्यापेक्षा पुढे आहे. अशोक चव्हाण यंच्यावर आरोप केलं ते भाजपसोबत गेले. भोपाळमध्ये भाषण केले बँक आणि इरिगेशन मध्ये घोटाळा केला असा आरोप केला. ज्यांच्यावर आरोप केले ते आज कुठं आहेत? झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं असेही शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com