Tanaji Sawant On Devendra Fadnavis:
>> भरत नागणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणून मला आमदार केले असं मोठं राजकीय विधान केले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाकाव या गावी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकदाही नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत. त्यांनीच मला राजकारणात आणले आणि सावंत कुटुंबातील पहिला आमदार मला केले.
केवळ 55 मत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला 348 मत घेऊन दिली. त्यामुळे मी आमदार झालो, अशी भावना ही सावंत यांनी व्यक्त केली.
अकलूज बोले अन् सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था आज राहिली नाही. आम्हा सावंत बंधूचे विस्थापित राजकारण असलं तरी आम्ही कधीही स्वामीमान घाण टाकला नाही. जे कोणी स्वतःला दिग्गज समजत असतील, जाणता राजा म्हणत असतील अशांना मी 30 वर्षं टक्कर देतोय माझं कुणी वाकड करू शकलं नाही, असा टोलाही सावंत यांनी शरद पवार यांना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.