Nagar Panchayat Election: बहिष्कारामुळं 'या' नगरपंचायतीसाठी मतदानच झालं नाही; ६ उमेदवार आले निवडून बिनविराेध

राज्यातील एकमेक नगरपंचायत जेथे निवडणुकीसाठी मतदानाच झाले नाही.
shirdi
shirdisaam tv

शिर्डी : शिर्डी नगरपंचायतीचे शिर्डी नगरपरिषदेत रूपांतर व्हावे यासाठी शिर्डीतील सर्व पक्षाच्या वतीने नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला हाेता. त्यामुळे येथे मतदान झाले नाही. दरम्यान १७ जागांपैकी सहा जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्या सर्वांची बिनविराेध निवड झाली आहे अशी माहिती शिर्डीचे (shirdi) निवडणूक अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. (nagar panchayat election result 2022)

shirdi
Shrikant Shivade: श्रीकांत शिवदेंचं निधन; सलमानसह उदयनराजेंचा महत्वाचा लढला हाेता खटला

शिर्डी नगरपंचायतच्या निवडणूकीत (nagar panchayat election) १७ वार्डातील सहा जागेवर बिनविरोध झालेल्या सहा अपक्ष उमेदवारांना अखेर अधिकृत प्रमाणपत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते शिर्डी नगरपंचायतच्या सभागृहात देण्यात आले आहे. (Maharashtra Nagar Panchayat Election Results)

बिनविराेध निवडून आलेले सदस्य

वार्ड नंबर 1 अनिता सुरेश आरने

वार्ड नंबर 5 अर्चना अमृत गायके

वार्ड नंबर 8 शेळके प्रसाद प्रकाश

वार्ड नंबर 10 चौगुले आरती संभाजी

वार्ड नंबर 11 आरने सुरेश काळू

वार्ड नंबर 14 सचिन उर्फ संभाजी नानासाहेब चौगुले.

edited by : siddharth latkar

shirdi
Satara: सेना आमदार निघाले भाजपात? ज्येष्ठ नेते शरद पवारांना केलं 'हे' आवाहन
shirdi
Nagar Panchayat Elections 2022 Result: नारायण राणेंच्या बालेकिल्यात सेनेस ७ जागा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com