Shrikant Shivade: श्रीकांत शिवदेंचं निधन; सलमानसह उदयनराजेंचा महत्वाचा लढला हाेता खटला

श्रीकांत शिवदे हे राज्यात फाैजदारी खटला लढण्यात पारांगत हाेते.
Advocate Shrikant Shivade
Advocate Shrikant Shivade Saam Tv

सातारा : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (salman khan) आणि शायनी आहुजा यांच्याशी संबंधित हाय-प्रोफाइल खटले हाताळणारे आणि टू जी स्पेक्ट्रम प्रकरणातील दोन आरोपींचे प्रतिनिधित्व करणारे प्रख्यात वकील श्रीकांत शिवदे (Shrikant Shivade) (वय ६७) यांचे आज (बुधवार) प्रदीर्घ आजाराने एका खासगी रुग्णालयात निधन झाले. शिवदे यांना ल्युकेमिया (रक्त कर्करोग) असल्याचे निदान झाले होते असे निकटवर्तीयांनी नमूद केले. (Noted Criminal Laywer Shrikant Shivade Passes Away)

Advocate Shrikant Shivade
Poonam Pandey: पाॅर्न फिल्म प्रकरणात पूनम पांडेला सर्वाेच्च न्यायालयात मिळाला दिलासा

शिवदे यांनी सन २००२ मध्ये हिट-अँड-रन प्रकरणात अभिनेता सलमान खान (salman khan) आणि अभिनेता शायनी आहुजा ज्याच्यावर सन २००९ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे खटले लढले हाेते. याबराेबरच शरद लेवे (sharad leve) खून खटल्यात शिवदे यांनी साता-याचे (satara) विद्यमान खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशिल पाटील यांच्यासमवेत खटल्याचे कामकाज पाहिले हाेते.

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणांमध्ये दोन आरोपींचे आणि शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जी यांच्या बाजूने ते लढले होते. हिरे व्यापारी भरत शहा यांचाही खटला त्यांनी लढला हाेता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आणि आई असा परिवार आहे.

edited by : siddharth latkar

Advocate Shrikant Shivade
Satara: उदयनराजेंचे मनोरंजन पहा व साेडून द्या; सातारकरांना शिवेंद्रराजेंचे आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com